डॉ. पंकज चतुर्वेदी,
उपसंचालक, टाटा मेमोरियल संस्थान.
प्राध्यापक तथा शल्यविशारद, डोक आणि मान कर्करोग शस्त्रक्रिया विभाग.
मुंबई येथील एन.एस.सी.आय. (National Sports Club Of India) च्या प्रांगणात टाटा मेमोरियल रुग्णांलयातील ज्या कर्करोग ग्रस्त रूग्णांना कोव्हीड-19 आजाराची लागन झाली आहे अशांसाठी एक विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. तेथील कक्षासमोर एक लहान निरागस मुलगी अगदी हुंबरडे देऊन रडताना मी पाहत होतो. तिचे वडील देखील त्याच भावनिकतेने विचलित दिसत होते. ते सातत्याने विनवण्या करत होते की, त्यांना त्यांच्या मुलीबरोबर कोव्हिड-१९ आजाराच्या साठी सज्ज असलेल्या रुग्णालयामध्ये राहण्याची परवानगी मिळावी. समोर जे काही घडत होते ते अतिशय भावनिक होते आणि ते पाहून मला देखील माझे अश्रू अनावर झाले होते, याची सत्य कहानी सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे.
कोव्हीड -१९ आजाराच्या उपचारांबाबत शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार एक कोव्हीड -१९ बाधित रुग्णच फक्त विलगीकरण कक्षात जाऊ शकत होता. यामध्ये मुस्कान नावाची बालिका कोव्हीड-१९ बाधित रुग्ण होती परंतु तिचे वडील कोव्हीड -१९ बाधित रुग्ण नव्हते. मी मुस्कानला व तिच्या बाबांना दोघांनाही शक्यतो सर्व प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला आपणास किमान २ आठवडे तरी त्यांना मुस्कान पासून दूर राहावे लागेल. दुपारच्या धगधगत्या सूर्याखाली, विलगीकरण कक्षा जवळउभे राहिलेले सुरक्षा कर्मचारी हे सर्व पाहून त्यांचा संयम गमावत अस्वस्थ होत होते. त्या कर्मचाऱ्यापेकी एकाने पी .पी. ई. किट परिधान केला होता तो मुस्कानचा हात पकडून तिला हळुवारपणे रुग्णालयामध्ये घेऊन जाऊ लागला .मुस्कान लंगडत चालत होती आणि सपोर्ट असताना देखील तिला नीट चालत येत नव्हते. तिचा पूर्ण डावा पाय पट्टीने बांधलेला होता आणि त्याला सूज देखील आलेली दिसून येत होती. तिला भयंकर वेदना होत होत्या. मला आज हि तो क्षण आठवतोय . मुस्कान निरागसपणे केविलवाण्या आवाजात हात जोडून पाणावलेल्या डोळ्यांनी तिच्या वडिलांना तिच्या बरोबर राहण्याची परवानगी देण्याकरिता विनवण्या करत होती.सातत्याने ती एकच वाक्य बोलत होती “मी माझ्या बाबांशिवाय राहू शकत नाही. कृपाकरून त्यांना माझ्या बरोबर आत येऊद्या “मी स्तब्ध मनाने गारठ्यात गारठल्यासारखा उभा होतो. मला काही सुचतच नव्हते तिचे कसे सांत्वन करावे. अचानक मनातधैर्य आले आणि मी मुस्कान ला म्हणालो ” मी दिवसातून दोन वेळा तुला फोन करेन आणि तुला हवं असेल तर तू मला दिवसातून कितीही वेळा माझ्या मोबाइलवर मला कॉलकरू शकतेस”. माझं बोलणं तिला क्षणिक हि दिलासा देऊ शकत नव्हतं पण माझ्याकडे दुसरा असा कोणता पर्याय हि नव्हता कि मी मुस्कान ला तिच्या बाबांबरोबर ठेऊ शकेन.
मुस्कानचे वडील आता चिडले होते आणि उन्मत्त देखील झाले होते कारणते त्यांच्या मुलीच्या सानिध्यात होते आणि ते विषाणूचा वाहक सुद्धा होते. मी त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखण्याचा प्रयत्न करत होतो .असाह्यतेमुळे अश्रू त्यांच्या डोळ्यातून वाहत होते. पण अचानक त्या बापाचा संयम सुटला आणि आमच्या मधील असणाऱ्या बॅरिकेडवरून उडी मारून ते माझ्या पायाला पकडून जोरजोराने रडत विनवण्या करू लागले.
त्यांच्यापासून बाजूला होण्याचे धैर्य मी करूच नाही शकलो आणि तिथेच हताश उभा राहिलो. माझे मन सुन्न झाले होते. मला काहीच सुचेनासं झालं होत. मुस्कान हि १४ वर्षे वय असलेली गोंडसमुलगी ऑस्टिओसारकोमा नावाच्या गुढग्याच्या गंभीर कर्करोगाने ग्रस्त होती. या आजाराच्या उपचारासाठी ९ तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर २ आठवड्यापासून ती टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथेदाखल झालेली होती. ती आपल्याला कधी एकदा सुट्टी मिळेल आणि घरी जायला भेटेल याची आतुरतेने वाट पाहत होती. शस्त्रक्रियेदरम्यान तिच्या डाव्या पायाच्या गुढग्याचा सांधा काढून त्या ठिकाणी १४ इंच लांबीचा पर्यायी कृत्रिम सांधा बसवण्यात आला होता. त्यामुळे तिच्या पायावर २० सेंटीमीटर लांबीचा जखमेचा व्रण आलेला होता. या तिला झालेल्या कर्करोगामुळे ५ वर्षापेक्षा अधिक जीवन जगण्याची संभाव्यता ही फक्त ३०% असल्याने तिचे कुटुंब उध्वस्त झालेल्या यातनेतच जगत होते. तिची आई तिच्या गावाकडे दिवस रात्र मुलीच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होती. शस्त्रक्रियेनंतर मुस्कान ला कोविड -१९ आजाराचा संसर्ग झाल्यामुळे त्याच्या प्रादुर्भावामुळे ताप आला. तिचे संपूर्ण कुटुंब विखुरलेले आणि दुःखी होते. आणि आता आपली मुलगी घरी येईल याची वाट पाहणाऱ्या त्या कुटुंबाला झोपेत कुणी डोक्यावर प्रहार करावा असा धक्का बसला होता. टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे मुस्कान तिच्या बाबांबरोबर राहून उपचार घेत होती. मुस्कान उपचारादरम्यान तिच्या बाबांसोबत राहत होती तर तिची आई मुस्कानच्या लहान भावाबरोबर झारखंड मधील एका छोट्या गावी राहत होती. कोविड -१९ आजाराच्या प्रादुर्भावामुळे मुस्कानला एन. एस. सि. आय. (National Sports Club of India) च्या कोव्हीड -१९ रुग्णालयातील विलगीकरणकक्षात नेण्यात आले. या ५०० बेडच्या भव्य रुग्णालयात ७५ बेड हे खास कर्करोगाने पीडित रुग्णांनाकरीता आरक्षित ठेवण्यात आले आहेत.
दुर्देवाने तिच्या बाबांना दुसऱ्या विलगीकरण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले. नंतर मला प्रशासनाकडून समजले कि मुलीबरोबर एकाच कोव्हीड -१९ विलगीकरण रुग्णालयामध्ये राहायला मिळावे याकरिता तिच्या बाबांनी टाटा रुग्णालयातील सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांना ते कोव्हीड -१९ पॉजिटीव्हआहेत असे खोटे सांगितले. परंतु त्यांच्याकडे कोव्हीड -१९ पॉजिटीव्ह असल्याचा अहवाल नसल्यामुळे हा प्रकार विलगीकरणकक्षातील रेसेपशन काउंटर ला उघडीस आला. एका हताश बापाने मुलीबरोबर आत जाण्यासाठी सर्व प्रयत्न केले परंतु ते व्यर्थ गेले.
माझ्या शेजारी असलेल्या पोलिसाच्या ओरडण्यामुळे माझी गाढ तंद्रा तुटली. मी विषाणूचे संक्रमण करणाऱ्या अशा जोखमी व्यक्तीजवळ खूप जवळ उभा होतो म्हणून पोलिसांना माझाराग आला होता. मी पटकन मुस्कानच्या वडिलांपासून थोडा दूर झालो जेअद्याप हि जमिनीवर हात जोडून बसले होते. मी त्यांना आश्वासित केले कीतुमच्या मुलीची योग्य ती काळजी माझ्याकडून व माझ्या सहयोग्यांकडून घेतली जाईल. ते त्यांच्या विलगीकरणकक्षाकडे हळुवारपणे दुःखित चेहऱ्याने निघून गेले.
काही मिनिटातच मुस्कान ने मला एन. एस. सि. आय. कोव्हीड -१९ रुग्णालयातून कॉल केला. ती सारखी रडत होती. एकटी पडल्याने भीतीने व्याकुळ होती. त्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ७५ कर्करोगाने ग्रासीत रुग्णांपैकी मुस्कान ही एकटीच लहान मुलगी होती. मी जमेल त्या पद्धतीने तिला समजावण्याचा विफल प्रयत्न करत होतो. मी समजावत होतो की मला तुझ्यासारखी एक लहान मुलगी आहे, मी किती प्रेम करतो तिला ते आणि त्याच सारखं प्रेम मी तुला ही करतोय तसेच तुला कसली अडचण येऊ देणार नाही. मी २० मिनिटे तिच्याशी बोलत हतो तिचे मन वळवण्याचे प्रयत्न करत होतो ज्यामुळे तिचा एकटेपणा आणि तिच्या वडीलांपासून झालेला दुरावा कमी करू शकेल. पण दुसऱ्या बाजूनेमलात्या निरागस मुलीच्या रडण्याच्या आवाजाशिवाय काही ऐकू येत नव्हते. ती काहीही बोलत नव्हती. मी जेव्हा फोन ठेवला तेव्हा मला माझे अश्रू अनावर झाले होते.
मी त्या रात्री घरी पोहोचलो आणि माझ्या पत्नीला मुस्कान आणि तिची स्थिती बद्दल सांगितले. नंतर आम्ही दोघे तिच्याशी विडिओ कॉलद्वारे बोललो. परंतु तिचा निराश चेहरा मन हेलावणारा वाटत होता. ती अगदी अंशतः बोलली. त्या रात्री ती जेवलीसुद्धा नाही. त्या रात्री मी झोपू शकलो नाहीआणि तिचा सतत विचार करत राहिलो. दुसऱ्यादिवशी सकाळी मी त्या रुग्णालयात जाण्यासाठी आणि तिच्या साठी समुपदेशन सुरु ठेवण्यासाठी आतुर झालेलो होतो. मी वारंवारतिला फोन करत होतो पण मुस्कानफोन उचलत नव्हती. तिच्या बाबांनी देखील मला फोन करून सांगितले कि मुस्कान फोन उचलत नाही. मी अस्वस्थ झालो आणि तेथील नर्स ला फोन केला तेव्हा समजलं कि मुस्कान तिच्या बेड वरनाही. हे ऐकताच माझे हृदय मला दुःखाने बुडल्यासारखे झाले. आणि क्षणात मनामध्ये वेगवेगळे नैराश्याचे विचार येऊ लागले. मीएन.एस.सि.आय कोविड रुग्णालयात पोहोचताच रुग्ण प्रतिक्षाकक्षाकडे धाव घेतली. मी तिकडे पोहोचताच पाहतो तर काय हि चिमुकलीपाच वृद्ध कर्करोगाने ग्रसित महिला रुग्णांच्या घेरावामध्ये बसलेलीहोती. हे रुग्ण देखील टाटा रुग्णालयात कर्करोगाचे उपचार घेणारे होते. या ५ वृद्ध स्त्रिया कमी शिकलेल्या होत्या आणि मुस्कान त्यांची सकाळपासूनच सहाय्यक झाली होती.
मुस्कान त्यांच्या नातेवाईकांशी बोलण्यास मदत करत होती त्यांचे औषध घेण्यास मार्गदर्शन करत होती तसेच नैतिकतेनेत्यांना प्रोत्साहित करत होती आणि त्यांच्या समस्या परिचारिकेपर्यंत पोहोचवत होती. मला विश्वास बसत नव्हता कि एका रात्रीत मुस्कान एक कर्करोग बाधित रुग्णापासून एक काळजीवाहू नर्स झाली होती. ती सर्व कर्करोगग्रस्त रुग्णांशी बोलण्यात इतकी व्यस्थ होती की तिने मला बोलायला खूप कमी वेळ दिला. हे पाहून मी माझ्या आनंदाश्रुंवर नियंत्रण ठेवण्यासाठी धडपडत होतो. माझी दत्तक मुलगी एका रात्रीत मोठी झाली होती!
दुपारपर्यंत मुस्कानने मला स्वतःसाठी नाही तर इतर रुग्णांच्या मदतीसाठी कॉल करण्यास सुरवात केली. संपूर्ण संध्याकाळ, ती एका गंभीर आजारी वृद्धाला, लावलेल्या ऑक्सिजन मास्क ला पकडूनत्याच्या शेजारी बसली होती आणि तो वाचण्यासाठी त्याच्यासाठी प्रार्थना करत होती.
मुस्कान परिचारिकेला रक्त काढण्यासाठी रुग्णाचा हात धरण्यास तसेच रुग्णांच्या नाकातअसलेल्या फिडिंग ट्यूब द्वारे त्यांना अन्न देण्यास मदत करत होती. काही मातांना त्यांच्या लहान बाळांसहीत एकांतात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते त्यामातांसाठी आणि त्यांच्या बाळांसाठी ती बेबी सिटर बनली होती.यात एकदा एका अतिगंभीर आजारी महिलेला मदत करण्यावरुन नियम न पाळल्याने तिला स्थानिक कर्मचाऱ्यांनी रागावले देखील होते परंतु मुस्कान सर्व रुग्णांची मदत करत राहिली .एका बंगाली महिलेची सूर्यास्त पाहण्याची इच्छा मुस्कान ला पूर्ण करायची होती.
विलगीकरण कक्षातल्या कर्मचाऱ्यांमध्ये इतक्या कमी वेळात मुस्कान सगळ्यांची लाडकी झाली होती.मला सुरवातीच्या दोन दिवसामध्ये मुस्कान दिवसातून ४ वेळा कॉल करायची नंतर मग ती प्रत्येक दिशी एक वेळच कॉल करू लागली. रोज आमच्या गप्पा खूप वेळ सुरु असायच्या. त्यात मुस्कान मला विलगीकरण कक्षातील पूर्ण दिवसातील गोष्टी सांगत असे. मी परवानगी नसताना देखील मुस्कान साठी बिस्कीट, फळे, केक घेऊन जात होतो. कर्करोगावरील किमोथेरपी उपचारामुळे मुस्कान चे केस गेले होते. मी तिला एक छान टोपी दिली जी तिथे तिने कधीच घातली नाही.विलगीकरणकक्षात जातांना तिच्याकडे दोन ड्रेस होते. माझ्या पत्नीने मुस्कान ला कपड्यांचा एक सेट दिला .रोजचा दिनक्रम चालू होता. यात दहा दिवस पटकन निघून गेले. या दहा दिवसाच्या कालावधीत मुस्कान शी माझे एक भावनिक घट्ट नातं विकसित झालं होत. मी तिला व तिच्या वडिलांना जे वचन दिले होते त्याबद्दल मला खूप जाणीव होती. शेवटी, मी तिच्या वडिलांसारखेच असायला हवे होते जेव्हा ती एकटी पडली होती.
दहा दिवसानंतर जेव्हा कोव्हीड १९ ची चाचणी घेतली तेव्हा त्यात कोविड चा प्रादुर्भाव दिसून आला आणि त्यामुळे मुस्कान ला अजून सात दिवस तिथेच थांबावे लागणार होते. मुस्कान ही बातमी ऐकताच क्षणिक निराश झाली पण लगेचच तीने खिलाडी वृत्तीने वाढलेला वेळ स्वीकारला. उलट परिणामी प्रत्येक क्षण जणू आनंदित होऊन जगत आसपासच्या लोकांना मदत करण्यात ती अवधी मग्न झाली होती की, तिला स्वतःच्या आजाराचे, वेदनांचे, दुखःचे भानच राहिले नाही.या निरागस लंगडत चालणाऱ्या, पायावर शस्त्रक्रियेची जखम असणाऱ्या चिमुकलीने मानवता आणि सेवा म्हणजे काय याची जणू मशालाच नकळत लावल्यासारखं वाटत होत. जेव्हा मी व माझे सर्व कर्मचारी,सहसोबती पी .पी. ई. किट परिधान करून आरोग्य सेवा देत होते तेव्हा मुस्कान पण कोणत्याही उपकरणाशिवाय चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवून मदत करत होती. त्या विभागात ती सर्वांची लाडकीतर होतीच शिवाय तिचा उत्साह हा प्रेरणादायी होता. एके दिवशी फोन कॉल वर मुस्कान मला हसत म्हणाली की सर्वांच्या प्रार्थना तिला आजारातून ठिक करतील. मुस्कान ला तिच्या कर्करोगाच्या परिणामाची पूर्ण कल्पना होती.
सात दिवसानंतर तिचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तेव्हा माझ्या मनात एक विचीत्र भावना अनुभवली. त्या भावनेत सुखाचे आणि दुःखाचे मिश्रण होते. मला वाईट वाटले की आता मुस्कान माझ्या पासून दुरावेल आणि तिच्या वडिलांकडे जाईल.त्या कक्षातल्या सर्व नर्स निराश झाल्या होत्या त्यांचा एक मदतीचा हात कमी झाला होता.रुग्ण दु:खी झाले कारण मुस्कान यापुढे त्यांच्या मदतीकरीता उपलब्ध होणार नव्हती. ती एकुलती एक त्यांची काळजी घेणारी होती जी विना पी.पी.ई किट परिधान करून असायची आणि त्यांना मुक्तपणे स्पर्श करत असायची.
मुस्कान आणि तिचे बाबा खूप उत्साहित आनंदित होते. जेव्हा मुस्कान रुग्णालय विलगीकरण कक्षाच्या बाहेर आली तेव्हा तिच्या पाठीशी कितीतरी भावनेने भरलेले चेहरे दिसत होते. कोव्हीड १९ चा संसर्ग रोखण्यासाठीच्या नियमावली नुसार आम्हाला एकमेकांमध्ये अंतर ठेवणे गरजेचे होते. त्यानुसार मी तीन मीटर अंतरावर थांबलो होतो आणि माझ्याकडे येण्यास मुस्कान ला मनाई करण्यात आली होती. बाहेर येताच तिने माझ्याकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर विलक्षण आपुलकी स्नेह दिसून येत होता. तिचे डोळे पाण्याने भरून आले होते .ती माझ्याकडे येऊ लागली; मला समजलेच नाही मी तसाच मुस्कान कडे पाहत स्तब्ध उभा राहिलो एक स्तब्धता आली होती. मुस्कान ने आदराने माझ्या पायाकडे तिचे हात सरसावले मला तिच्या बद्दल एवढा आदराचा भाव आला की मी तिला रोखून तिचे पाय स्पर्श केले. नंतर ती तिच्या बाबांकडे लंगडत गेली. मुस्कानचे इतरांच्या प्रति सहकार्याचे, मानवतेचे, साहसाचे, निरागसतेचे करावे तेवढे कौतुक कमीच पडेल.
मुस्कान ने मला महत्वाचा धडा शिकवला, आपल्या स्वतःचे दुःख विसरण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्याभोवती आनंद पसरवणे. आनंदित व्हायचं असेल तर इतरांना आनंदित करा. समाधान हे कायम अपेक्षा आणि उपलब्धता यांच्यातील ओढाताणीचे उप उप्त्पादन आहे. विजेते नेहमी थोड्या किंवा कमी अपेक्षा नसल्याने क्षुल्लक कारणाने झुकतात. ही कहाणी एक तरुण रुग्नेचे परिवर्तन तिच्या रुग्ण या स्वरूपातून ती एक दयाळू काळजीवाहू रूपातकशी बदलली याबाबत आहे. या कहाणीतून अशी शिकवण मिळते की सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी कोविड १९ आजार हि एक त्यांना ईश्वराने दिलेली संधी आहे सेवा करण्याची. हे त्यांना आव्हान आहे. शेवटी यश हे आव्हानांना संधी मध्ये रूपांतरित केल्यानेच मिळत असते.यातूनच आनंद मिळत राहतो. माझी मुस्कान निघुन गेली पण बरोबर कोरोनाची भीती हरवून गेली,एक नक्की आहे मुस्कान कायम जिंकेल!
Acknowledgement –
Suvarna Shinde
Rahul Sonawane
चांगला कार्य अल्लाह या आमच्या बहिनी कडून अशीच सेवा करून ।घे
LikeLike
Sir excellent and full of positive thoughts story.
LikeLike